उत्तर महाराष्ट्र

नाशिक: पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे (water leakage on water supply) प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत आहे. त्यातल्या त्यात जलकुंभ ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यात सर्वाधिक गळती होत असते. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाण्याच्या थेंब अन् थेंबाचा हिशेब लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.स्मार्टसिटी कंपनीने स्काडामीटर (scadameters) बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे.नाशिक महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) शहरातील नागरिकांना पुरवल्या जात असलेल्या पिण्याच्या पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती होऊन महापालिकेला दरवर्षी ६४ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.(Nashik Municipal Corporation proposes to install scadameters to prevent water leakage on water supply)

ही पाणीगळती रोखण्यासाठी तसेच प्रत्यक्ष पुरवले जात असेले पाणी व नागरिकांकडून होत असलेला वापर, या पाण्याचा हिशेब जुळवण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने स्काडा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीची मदत घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास २५ हजार व्यावसायिक नळजोडण्यांना स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असताना आता जलकुंभ, पंपिगस्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रावर देखील स्काडा मीटर व सेंसर बसवले जाणार आहेत. सध्या नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे वर्षाला केवळ ६४ कोटी रुपये महसूल मिळत आहेत.

नाशिक महापालिका गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून रोज ५४८ दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्या पाण्यावर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेअंती नाशिककरांना ४३८ दशलक्ष लिटर दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. यापैकी प्रत्यक्षात केवळ २९७ दशलक्ष लिटर पाण्याचीच पाणीपट्टी आकारली जाते. उर्वरित १४१ दशलक्षलीटर पाण्याची गळती होते. यामुळे सध्याच्या पाणीवितरण व्यवस्थेतून होत असलेला तोटा कमी करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने स्काडामीटर व सेंसरचा बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्मार्टसिटी कंपनीकडून तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली. यामुळे पहिल्या टप्प्यात पाणी गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होते, याचा शोध घेता येणार असून, त्यानंतर ही पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करता येणार असल्याचे सांगण्यात येते.स्मार्टसिटी कंपनीकडून तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली. यामुळे पहिल्या टप्प्यात पाणी गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होते, याचा शोध घेता येणार असून, त्यानंतर ही पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करता येणार असल्याचे सांगण्यात येते.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago