उत्तर महाराष्ट्र

नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा मंगळवारी उघड करणार; संजय राऊत

पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका… सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल, अशी भावनिक साद घालत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जुने नाशिक येथील चौक मंडईत भर पावसात सभा घेतली.नाशिक महापालिकेतील(Nashik Municipal) भूसंपादन घोटाळा (land acquisition scam) १४ मे रोजी मुंबईत पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी (दि. ११) पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील ऐतिहासिक अशा चौक मंडई परिसरात महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.११) चौक मंडई येथे सभा आयोजित करण्यात आली होती.(Nashik Municipal Corporation to expose land acquisition scam on Tuesday; Sanjay Raut)

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते, नितीन भोसले, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, गजानन शेलार, संजय चव्हाण, मुशीर सय्यद आदी उपस्थित होते.

८ वाजेनंतर राऊत यांचे सभास्थळी आगमन झाले. त्याचवेळी पावसाचे वातावरण आणि सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यातच राऊत यांनी भाषणाला सुरुवात केली. देशात आणि राज्यात सध्या परिवर्तनाची नांदी असून नाशिककरांनी या बदलाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केली. याच दरम्यान पाऊस सुरू झाल्याने श्रोते उठायला लागल्यानंतर थांबा जाऊ नका, परिवर्तन हवे असेल तर थांबावेच लागेल असे सांगत त्यांनी भर पावसातही सभा चालू ठेवली. केंद्राबरोबरच राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकेचे आसूड ओढले. तत्पूर्वी वसंत गीते, गजानन शेलार, आकाश छाजेड यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा १४ मे रोजी मुंबईत पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे राऊत यांनी शनिवारी (दि. ११) पत्रकारांशी बोलताना सांगितले. सायंकाळी सातपूर येथील अशोक नगर येथे राऊत यांची सभा पार पडली.

काँग्रेस पदाधिकारी उभेच

महाआघाडीच्या सभेत प्रारंभी राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड बसलेले होते. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी येण्यास सुरुवात झाली, मात्र तोपर्यंत खुर्च्या भरल्याने त्यांना बराच वेळ खुर्चीसाठी प्रतीक्षा करावी लागली.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

8 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

10 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

11 hours ago