उत्तर महाराष्ट्र

दिंडोरीची जागा राष्ट्रवादी पवार गट तर नाशिकची ठाकरे गट लढवणार : शरद पवार

नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढविणार आहे. तर दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी बुधवारी नाशिकमध्ये केली. शरद पवार बुधवारपासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून हॉटेल एमराल्ड पार्क येथे त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. बुधवारी सकाळी त्यांचे फ्रावशी इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. नाशिक मध्ये आगमन झाल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामध्ये माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे आदींनी भेट घेतली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून नुकतीच शिंदे गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शरद पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाकडून विजय करंजकर अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
.शरद पवार यांनी लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल आहे, शेतकऱ्यांची सत्ताधारी पक्षावर नाराजी आहे. धुळे,नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ऊस महत्वाचे पीक आहे, कारण त्यापासून इथेनॉल आणि इतर उपपदार्थ तयार होतात. असे असताना त्या पिकाला देखील केंद्राची धरसोड वृत्ती कारणीभूत ठरत आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत तर बेरोजगारी महागाईमुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. यांची किंमत सत्ताधारी पक्षाला नक्कीच चुकती करावी लागेल. अनेक प्रश्नामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत सांगण्यासारखे काही मुद्दे नाहीत असा टोलादेखील पवार यांनी लगावला.

कार्यकर्ता सवांद आणि लोकसभा निवडणुकीचा कल
गुरुवारी (ता. १४) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवडला महाविकास आघाडीच्या मेळाव्यालाही शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार , काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक जिल्यात येत असल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दोन दिवसीय दौऱ्यात शरद पवारांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोकसभा निवडणुकीबाबत कल जाणून घेणार आहेत.

वंचित साठी सहा जागा देणार
वंचित बहुजन आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार असल्यानं आम्हाला आनंद आहे. आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे त्यांना
राज्यभरात सहा जागा देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

9 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

9 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

9 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

9 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

10 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

11 hours ago