उत्तर महाराष्ट्र

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding) असणारी परिस्थिती हि वेगवेगळी असून त्याबाबत काही मुद्द्यांद्वारे आपणास सत्य परिस्थिती दाखवू इच्छितो. तरी त्यास योग्य ती दखल घ्यावी. नाशिक शहरातील असोसिएशनच्या सभासदांच्या सर्व खाजगी होर्डिंगचे (private hoarding) स्ट्रक्चर ऑडिट झालेले आहे. मात्र महानगरपालिकेच्या शहराच्या रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेल्या दिशादर्शक कमानी, मनपाने स्वतः उभे केलेले होर्डिंग व मनपाने मनपाच्या मालकीच्या जागेत मक्तेदारामार्फत उभारलेले व स्वतः नोटीस देऊन जाहीर केलेले अनाधिकृत जाहिरात फलक याकडे मनपाचा कानाडोळा होत आहे.(Nmc turns a blind eye to the condition of private hoardings in Nashik city )

१) शहरातील खाजगी जागेतील नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन मेंबर्सचे सर्व जाहिरात फलक अधिकृत आहेत.

२) नाशिक मधील खाजगी जागेतील जमिनीवर ची जाहिरात फलकाची सर्वात मोठी साईज हि ४० X ३० असून त्यापेक्षा मोठी साईज नाशिकमध्ये नाही.

३) नाशिक मधील खाजगी जागेतील आमच्या असोसिएशन मेंबर्सचे सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट मागील ८ महिन्यापूर्वीच मनपाने नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत केले आहेत. त्यात जी काही किरकोळ दुरुस्ती सुचविली होती. ती सुद्धा दुरुस्ती आम्ही केली आहे. तसे रिपोर्ट मनपा कडे दिले आहेत.

४) नाशिक महानगरपालिका व नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव अशी संस्था व असोसिएशन आहे ज्यांनी मागील पिंपरी चिंचवड दुर्घटनेनंतर तातडीने व अगदी कमी कालावधीत खाजगी जागेतील जाहिरात फलकांचे मनापाद्वारे नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत १००% स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याचा रिपोर्ट मनपास सादर केलेला आहे.

५) नाशिक मधील खाजगी जागेतील आमच्या असोसिएशन सभासदांचे सर्व जाहिरात फलक हे पत्रा विरहित असून त्यामुळे हवेचा प्रेशर जरी आलाच तरी सदर जाहिरात फलकावरील फ्लेक्स फाटते व सदरच्या होर्डिंग स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारची हानी / नुकसान होत नाही व दुर्घटना होण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात आहे.

६) दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी आम्ही आमच्या प्रत्येक जाहिरात फलकांची पाहणी करून त्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्सला होल करतो. त्यामुळे तेथुन हवा पास होण्यास मदत होते. त्यामुळे सदर स्ट्रक्चरला हानी / नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.

७) जाहिरात फलक नुतनीकरण करतेवेळी मनपा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअर एजन्सी यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी करून स्ट्रक्चर स्टेबिलीटी सर्टीफिकेट मनपास सादर करण्यात येते.

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी

1) सदर होर्डिंग हे अनाधिकृत होते.

२) आकार – १२० फुट रुंद व १२० फुट उंच होते शिवाय दोन्ही बाजू. (Both Side Hoarding)

३) सदर जाहिरात फलकावर पत्रा लावलेला होता त्यामळे हवा पास न झाल्याने ते होर्डिंग कोसळले.

४) सदर जाहिरात फलक हा अनाधिकृत असल्यामुळे त्याचे फाउंडेशन हे सर्वच बाबतीत नियमबाह्य असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

नाशिक शहरातील असोसिएशनच्या सभासदांच्या सर्व खाजगी होर्डिंगचे (private hoarding) स्ट्रक्चर ऑडिट झालेले आहे. मात्र महानगरपालिकेच्या शहराच्या रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेल्या दिशादर्शक कमानी, मनपाने स्वतः उभे केलेले होर्डिंग व मनपाने मनपाच्या मालकीच्या जागेत मक्तेदारामार्फत उभारलेले व स्वतः नोटीस देऊन जाहीर केलेले अनाधिकृत जाहिरात फलक याकडे मनपाचा कानाडोळा होत आहे.

यावेळी नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम, सरचिटणीस गणेश बोडके, उपाध्यक्ष इम्तियाज अत्तर, सहचिटणीस रवी शिरसाठ, खजिनदार सौरभ जालोरी, नंदन दीक्षित, मच्छिंद्र देशमुख, सचिन गिते, मनोज केंगे, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, आबा देशमुख, संजय मालुसरे, संजय अस्वले, महेश गिरमे, गौरव माटे, दीपक पवार, निखिल सुराणा, विराज पवार, मनीष नाशिककर, बंटी धनविजय, हर्षद कुलथे, रमेश गीते, सोमनाथ पाटील, सुरेश सोळंके, हितेश यशवंते यांसह सर्व सभासद उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

45 mins ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 hour ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

2 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

2 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

4 hours ago