उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अॅक्शन मोडवर

नूतन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर अॅक्शन मोडवर येत कामकाजाचा धडाका लावला. सर्व विभागांना भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व विभाग प्रमुखांना दोन दिवसांमध्ये आपल्या कामांचे प्रेझेंटेशन तयार करण्याचे आदेश दिले. कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. दरम्यान आपण मनपा आयुक्तांसह सर्व अधिकारी व सेवकांना सोबत घेऊन नाशिक शहराच्या दृष्टीने चांगले काम करणार असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे स्वच्छ शहरांमध्ये आपले नाव येण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

झगडे यांच्याकडे आरोग्य, अग्निशमन, घनकचरा संकलन, मलेरीया यासारखे महत्वाचे विभागाचे कामकाज असेल. शहराचा कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू झालेला आहे. मात्र मागच्या वेळी सुमारे पावणे दोनशे कोटींचा ठेका यंदा तब्बल सुमारे ३५० कोटींवर गेलेला आहे. त्यावेळी तो चर्चेचा विषय बनला होता. सुमारे २५ लाख लोकसंख्या झालेल्या नाशिक शहराचा कारभर हाकणार्‍या महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त (सेवा) हे पद मागील सुमारे सहा महिन्यांपासून रिक्त होता. त्यामुळे इतर वरिष्ठ अधिकार्‍यांवर कामाचा ताण निर्माण झाला होता. दरम्यान शासनाने मनपा अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांची नियुक्ती केली आहे.

मनप‍ाकडे भूसंपादनासाठी पैसे नसल्याने कामटवाडे येथील प्रस्तावित ५६ एमएलडी क्षमतेचा मलजलशुद्दिकरण प्रकल्प (एसटीपी) अबंड अौद्योगिक वसाहतीतील जागेत उभारण्याची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी मनपा मलनिस्सारण विभाग महाराष्ट्र अौद्योगिक विकास नाशिक विभाग कार्यालयास जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पत्र पाठवणार आहे. मनपाने अौद्योगिक वसाहतीत रासायनिक, सांडपाणी शुध्दिकरण प्रकल्प उभारावा अशी उद्योजकांची जुनी मागणी होती. त्यामुळे कामटवाडे येथे एसटिपीसाठी भुसंपादनासाठी होणारा खर्च वाचवत एमआयडिसीतच दोन्ही एसटिपी उभारण्याचा मनपा विचार करत आहे.

सिंहस्थापुर्वी मनपा नमामी गोदा या मोठा प्रकल्प राबविणार असून त्यात गोदा स्वच्छता व प्रदूषणमुक्त करणे हा महत्वाचा उद्देश आहे. मागील सिंहस्थात मनपाने मखमलाबाद व कामटवाडे येथे प्रस्तावित एसटिपीसाठी जागेवर आरक्षण ठेवले होते. मात्र या जागांची किंमत आजमितीला कोट्यवधीच्या घरात पोहचली आहे. भूसंपादनासाठी दीडशे ते दोनशे कोटी खर्च होईल.पण सद्यस्थितीत मनपाची आर्थिक स्थिती नाजूक अाहे. ते पाहता या दोन्ही एसटिपीसाठी मनपाने पर्यायी जागेचा शोध सुरु केला आहे. मध्यंतरी अंबड व सातपूर अौद्योगिक वसाहतीत मनपाने एसटिपी उभारावा अशी आग्रही मागणी उद्योजकांनी केली होती. कामटवाडेच्या ऐवजी अौद्योगिक वसाहतीतच एसटिपी उभारावा व त्यासाठी महाराष्ट्र अौदयोगिक महामंडळाने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मनपाची अपेक्षा आहे. जागा उपलब्ध करुन दिल्यास
अौद्योगिक वसाहत व शहरासाठी आवश्यक अशा दोन्हींसाठी आवश्यक एसटिपी उभारणे शक्य होईल. तसेच कामटवाडे येथील प्रस्रावित एसटिपीसाठी येणार्‍या जागा भूसंपादनाचा खर्चही वाचेल. त्यादृष्टिने मनपा अौद्योगिक विकास महामंडळ नाशिक कार्यालयाला जागा उपलब्ध करुन द्यावी यासाठी पत्र पाठवणार आहे. त्यास समोरुन कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागून आहे.

मखमलाबादचा एसटिपी तपोवनात
कामटवाडेप्रमाणेच मखमलाबाद येथील प्रस्तावित एसटिपीसाठी भूसंपादन खर्च वाचविण्यासाठी पर्यायी जागा म्हणून तपोवन येथील जागेचा विचार सुरु आहे. या ठिकाणी असलेला जुना एसटिपीच्या ऐवजी नवीन एसटिपी उभारला जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रम‍‍ाणात जागा वाचणार असून त्या जागी मखमलाबाद येथील प्रस्तावित असलेला एसटिपी उभारला जाईल.

कामटवाडे येथील प्रस्तावित एसटिपीसाठी एमआयडिसीत जागेचा विचार सुरु आहे. अौद्योगिक वसाहतीतील रासायनिक व सांडपाणी शुध्दिकरण प्रकल्पाची आवश्यकता आहे. जागा उपलब्धतेसाठी अौद्योगिक विकास महामंडळाला पत्र पाठवणार आहे.
– संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंत‍ा. मनपा

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

10 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago