उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा, तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली. या सभांमधून राजकीय आरोप-प्रत्यारोप झालेले असले तरी, सभांच्या केंद्रस्थानी जिल्हयाचा कांदा (Onion) असल्याचे दिसून आले.(‘Onion’ remains at the centre of meetings in Nashik district)

जिल्ह्यातील कांदा(Onion) प्रश्न सध्या देशपातळीवर चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या तिन्ही टप्यात कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी कों करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर रान उठवले आहे. तर, जिल्ह्यातील भाजपनेही या प्रश्नांची काहीशी धास्ती घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कांदा प्रश्न निवडणुकीत ऐरणीवर आलेला आहे. यातच, अंतिम टप्यातील राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सभांमध्येही कांदा प्रश्न गाजत आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून नेत्यांच्या सभांचा धुराळा सुरू आहे. बुधवारी महायुतीच्या उमेदवारांसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे, दादा भुसे आदींच्या दीं उपस्थितीत सभा झाली. या सभेत, मंत्री भुजबळ यांनी कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.

राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धर्तीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी मागणी करत हा प्रश्न उपस्थित केला. तर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही कांदा प्रश्नाला हात घालत कांद्याचे कायमस्वरूपी निर्धारित मुल्य निश्चित करण्यासाठी धोरण आखले जाईल असे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी भाषणात, कांदा प्रश्नांवर भाष्य करण्यास एका शेतकऱ्यांनी भाग पाडले. पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नी करत असलेल्या धोरणांचा पाढा वाचला. शहरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेतही त्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याचे मुद्दा उपस्थित केला. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे झालेल्या सभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कांदा उत्पादकांना बोलू दिले जात नसून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचे सांगितले.दिंडोरी तालुक्यातील वणी येथे झालेल्या सभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कांदा उत्पादकांना बोलू दिले जात नसून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचे सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

8 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

9 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

10 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

11 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

12 hours ago