उत्तर महाराष्ट्र

मान्सून काळातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आराखडा तयार ठेवा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सूनपूर्व (monsoon) तयारीबाबत आढावा बैठकी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) बोलत होते.आगामी मान्सून जवळ येत असल्याने याकाळात होणारे भूस्खलन,पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी ( avoid possible mishaps) प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज व अद्ययावत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.(Prepare a plan to avoid possible mishaps during monsoon – Collector Jalaj Sharma)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठकी जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर प्रविण धत, नाशिक महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, कळवण सुरगाणाचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहाव, संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा त्वरित तयार करुन आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्यात, नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचवटी, त्र्यंबकेश्वर, वणी यासारख्या धार्मिक स्थळांसाठी मान्सून काळात विशेष लक्ष देवून नियोजन करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाने जलजन्य आजारांचा पुरेसा औषधसाठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. अवैध जाहिरात फलक हटविण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्कतेने काम पाहावे. महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना ही यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिल्या.

याबैठकी दरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मोहमद मुदतशीर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी त्यांच्या विभागांनी केलेल्या मान्सून पूर्व तयारीचे सादरीकरण केले.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago