उत्तर महाराष्ट्र

आचारसंहिता काळात ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई; पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा धडाका लावलेला होता. आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आर्म ॲक्ट, एमडी, गुटखा, गांजा असा एकूण सुमारे ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी (Maheshwar Reddy) यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.(Preventive action against 8,330 people during the model code of conduct period; Superintendent of Police Information by Maheshwar Reddy)

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या महिन्यात देशभरात आचार संहिता लागल्यापासून निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले होते. १६ मार्च पासून पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी तसेच अवैध धंदे चालकांवर कारवाईचा धडाका लावलेला होता. यामध्ये आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे. यात ९ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत तर १ गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापैकी ३ हजार २५० जणांना नोटीस बजावण्यात आली असून २ हजार ७६४ जणांना नॉल बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे उपस्थित होते.

जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ज्याप्रमाणे प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अवैध धंदे चालकांसह आमली पदार्थांची वाहतुक व विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीची कारवाई केल असून त्यामध्ये १ कोटी ७ लाख रुपयांची २ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

1 hour ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

2 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

2 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

3 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

3 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

5 hours ago