उत्तर महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती. मात्र आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची ( Teachers’ constituency elections) आचारसंहिता येत्या पंधरा जून लागू राहणार असल्याने तोपर्यंत मनपाच्या विकासकामांना (municipal development works) पुन्हा ब्रेक लागणार आहे. सद्यस्थितित शहराशी निगडीत अनेक महत्वपूर्ण निविदा आचारसंहितेच्या कचाटयात अडकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मागील १५ मार्चला लागू झाली. त्यामुळे अनेक विकासक‍मांच्या निविदा उघडता आल्या नाहित. त्यात प्रामुख्याने शहरावरील पाणी कपात टाळण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्यापुर्वी सर्वेक्षणाचा विषय आहे. तसेच इतर पाणी पुरवठा विषयांचा देखील समावेश आहे.(Teachers’ constituency election code of conduct affected; Another break in municipal development works)

शहराच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण धूर फवारणी ठेका, अग्निसुरक्षेच्यादृष्टिने महत्वपूर्ण नव्वद मीटर शीडी खरेदी, मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोकळ्या जागांवर मोबाईल टाॅवर उभारणे, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोकळे भूखंडावर पे अँण्ड पार्किंग व्यवस्थ‍ा करणे, शहरातील अपघाताच्यादृष्टिने महत्वपूर्ण ब्लॅक स्पाॅट हटवणे, पावसाळया पुर्वी शहर व उपनगरातील नाल्यांची साफसफाई, कर देयके वाटपासाठी खासगी एजेन्सी नेमणे आदींसह महत्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. यातील अनेक विषयांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या. त्यांना प्रतिसादही मिळाला. पण त्या निविदा उघडण्याच्या दिवशीच आचारसंहिता लागू झाली. यातील काही विषय तातडीने मार्गी लागणे अपेक्षित असल्याने मनपा प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवत निविदा उघडण्याची विशेष परवानगी मागितली. मात्र त्यास प्रतिसाद लाभला नसून चर सर्वेक्षणसह अनेक कामे रखडली आहेत. त्यात आता शिक्षक मतदारसंघ निवडणूक ( Teachers’ constituency elections) कार्यक्रम जाहिर झाला असून पंधरा जूनपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने विकासकामे पुन्हा रखडणार आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

6 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

7 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

10 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago