उत्तर महाराष्ट्र

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी शासनाने सीएमपी प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात केला. तो यशस्वी झाल्याने शिक्षक समाधानी होते. राज्यात सार्वत्रिक प्रयोग करण्याची मागणी होत असतानाच नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे. काही तालुक्यांचे पुरेसे वेतन अनुदान नसल्याचे कारण सांगून जिल्ह्यात वेतन (non-payment of salaries) रोखण्यात येत होते. अनुदान प्राप्त झाले. तर आता नवीन आलेली ई-कुबेर प्रणाली (e-Kuber system) अडचणीची ठरत आहे. शालार्थ वेतन प्राणालीचे बिल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.(Teachers unhappy over non-payment of salaries for two months due to e-Kuber system)

संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतनही अडले आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन प्रयोगिक तत्त्वावर सीएमपी प्रणालीने केल्याने दर महिन्याच्या १ तारखेला वेतन होत असताना पुन्हा शासनाने ई-कुबेर प्रणाली विकसित केली या नवीन प्रणालीमुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अडकले आहे. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिक्षकांमधे प्रचंड असंतोष पसरला असून, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे. काही तालुक्यांचे पुरेसे वेतन अनुदान नसल्याचे कारण सांगून जिल्ह्यात वेतन रोखण्यात येत होते. अनुदान प्राप्त झाले. तर आता नवीन आलेली ई-कुबेर प्रणाली अडचणीची ठरत आहे. शालार्थ वेतन प्राणालीचे बिल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतनही अडले आहे.

तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक हवालदिल झाले आहेत. एलआयसी,पतसंस्था, बँकेचे हप्ते, कर्जावर अतिरिक्त व्याजाचा बोजा पडतोय, याशिवाय खर्चास पैसे नसल्याने शिक्षकांमधे कमालीचा असंतोष वाढत आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प कपात, मुख्याध्यापक अकाऊंट, जॉईंट बँक अकाऊंट अशा विविध समस्यांमुळे येणाऱ्या एररने कुबेर प्रणाली डोकेदुखी ठरत आहे.जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, पृथ्वीबाबा शिरसाठ, कांतीलाल सोनवणे यांनी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याशी चर्चा केली असून, या समस्या लवकरात लवकर निकाली काढू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, वेतनाचा प्रश्‍न निकाली निघत नसल्याने शिक्षकांमधे रोष व्यक्त केला जात आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने आधीच ई-कुबेर व शालार्थ प्रणालीचे टेस्टिंग करायला पाहिजे होते. तसे केले असते तर अशा अडचणी निर्माण झाल्या नसत्या.शालार्थ वेतन प्राणालीचे बिल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago