उत्तर महाराष्ट्र

पोलीस रंगले रंगपचमीत; ‘झिंगाट’वर धरला ठेका

नाशिक शहर पोलीस दलाने रविवारी (दि.३१) सकाळी १० वाजता धुमधडाक्यात रंगपंचमी उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी हिंदी गाण्यांसह ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’, आला होळीचा सण लय भारी यासह झिंगाट डान्स केल्याने उपस्थित अधिकारी व कर्मचारीही मागे राहिले नाही. नेहमीच शिस्त, कामाचा दबाव असलेले पोलीस मुक्तपणे डान्स करताना दिसून आले.नेहमीच बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना सण व उत्सवावेळी आनंदास मुकावे लागते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पदभार स्विकारल्यानंतर प्रत्येक सण, उत्सव व महापुरुषांची जयंती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत साजरे करण्याची सुरुवात झाली आहे.(The police were in a state of disrepair; Contract held on ‘Zingat’ )

चंपाषष्टी, दत्तजयंती, गणेशजयंती, शिवजयंती, मराठी भाषा गौरव दिन, महिला दिन, रंगपंचमी हे त्यातील काही उत्सव आहेत.रंगपंचमीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बिस्मराज सभागृहाबाहेर पोलिसांनी रंगमपंचमी साजरी केली. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बछाव (गुन्हे), परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते. पोलीस अधिकार्‍यांचा झिंगाट डान्स पाहून पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्साह भरला. सतत बंदोबस्त, गुन्ह्याचा तपास अशी कामे सुरू असतात. पोलिसही माणूस असून, सण उत्सव साजरा केल्याने ताणतणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते, असे मत पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केले

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

14 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

16 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

16 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

17 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

18 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

18 hours ago