उत्तर महाराष्ट्र

हजारो भक्तांचे भरउन्हात शक्ती प्रदर्शन

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज (shantigiri maharaj) यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election 2024) भारत माता की जय,जय श्रीराम,जय बाबाजी असा जयघोष करत मोठे शक्ती प्रदर्शन (show strength) करत आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला . महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी सकाळी पंचवटीतील गौरी पटांगण येथून रॅलीला सुरुवात केली. गौरी पटागंण येथून पंचवटी कारंजा, मालेगांव स्टॅंड, रविवार कारंजा , महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात जात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाशिक जिल्ह्यासह संभाजीनगर तसेच उत्तर महाराष्ट्र मधील हजारो भक्तानी शक्ती प्रदर्शन केले.(Thousands of devotees show strength in the sun)

गौरी पटांगण येथून सुरु झालेल्या रॅली मध्ये सर्वात पुढे काही भक्त परिवार होता. त्यानंतर महंत शांतिगिरी महाराज यांचा रथ होता. त्यावर महाराजांसह अनेक संत महात्मा विराजमान होते. यावेळी शांतिगिरी महाराज यांच्या समवेत स्वामी सेवागिरी महाराज, स्वामी लक्ष्मण गिरी महाराज, स्वामी परमेश्वर गिरी, ऋग्वेद नंदजी महाराज, जनेश्वर महाराज, स्वामी दिव्यानंद महाराज आदी उपस्थित होते तसेच ज्ञानेश्वर गामणे, निवृत्ती कांडेकर ,रवींद्र भोई, संजय भास्करे, बाळासाहेब गामणे, राजेंद्र इंगोले, गणेश पगार, नंदू शेठ पवार आदी उपस्थित होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराने ‘लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ अशा विचारातून शांतीदुतांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नाशिककरांच्या मनामनात शांतीगिरीजी महाराजांचे देशभक्तीचे विचार पोहचवले.’अब की बार दस लाख पार’ अशा ध्येयाने प्रेरित होऊन सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचले आणि यापुढेही अधिक गतीने प्रचार सुरू राहणार असल्याचा रॅलीत सांगण्यात आले. .भक्त परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मौनव्रतात विराट रॅली काढण्यात आली. हजारो भक्तांची . शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेली रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज,महारुद्र हनुमान,चांदीचा गणपती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.रामकुंडावर विधिवत गांगांपुजन करून भगवान कपालेश्वर महादेवांना नतमस्तक होऊन रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

खूप केलं नेत्यांसाठी आता लढू बाबांसाठी
हाती भगवे ध्वज,बॅनर वर लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा,नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज,शेतकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा, नोकरदारांचा आवाज,विद्यार्थ्यांचा, नारीशक्तीचा आवाज,गोरगरिबांचा, मजूरांचा आवाज शांतीगिरीजी महाराज , खूप केलं नेत्यांसाठी आता लढू बाबांसाठी असे फलक नागरिकांचे लक्ष वेधूंन घेत होते. भजनी मंडळ देखील रॅलीत सहभागी झाली होते. रॅलीत नाशिक शहरातील तसेच उत्तर महाराष्ट्र, संभाजीनगर आदी ठिकाणाहून संत,भाविक व हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

बाबाजींचा स्मार्ट जाहीरनामा
रॅली मध्ये अनेक भक्तगण बाबाजींचा जाहीरनामा वाटप करित होते. त्यामध्ये अयोध्येच्या राममंदिर धर्तीवर हनुमान जन्मस्थान येथे हनुमान मंदिराची उभारणी, शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणि मालाला हमीभाव, सन २०१७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन , त्रंबकेश्वरचा विकास, शासनाचा निधी १०० टक्के त्याच कामासाठी खर्च करणे, गुरुकुल परंपरेतून राष्टप्रेमी बालक घडवणे, गंगा गोदावरीची स्वछता, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्न देण्याचा प्रयत्न याचा समावेश आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

12 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

13 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

14 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

18 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

18 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

20 hours ago