आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ’प्रोटेक्टींग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स’ ही या वर्षाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची (World Anti-Tobacco Day) थीम आहे. तंबाखू सेवनामुळे अनेक गंभीर आजार होतात. व्यसनांपासून लांब राहण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.(University of Health Sciences takes oath on World Anti-Tobacco Day)

जागतिक तंबाखू विरोधी दिन(World Anti-Tobacco Day) दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल (dangers of tobacco) जनजागृती करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम आहे “तंबाखू पर्यावरणासाठी धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयाला त्रास होतो. रोग, पक्षाघात, कर्करोग आणि मधुमेह (Cancer and diabetes). शिवाय, यामुळे टाइप 2 मधुमेह होतो. मधुमेहाचा धोका देखील वाढतो. या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे याबाबत 31 मे जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त (anti-tobacco day) सांगीतले जाते.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा इतिहास
तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन सुरू केला. हा दिवस 7 एप्रिल 1988 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यानंतर, 31 मे 1988 रोजी WHO 42.19 ठराव पारित झाल्यानंतर, दरवर्षी 31 मे रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणारे नुकसान सांगणे हा आहे.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, केंद्र शासनाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्देशित केल्यानुसार विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) शपथ घेतली. वैयक्तिक व सामाजिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे समन्वयन व संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.याप्रसंगी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago