उत्तर महाराष्ट्र

नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (teachers constituency) निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार (teachers constituency) संघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले (Vivek Kolhe) की, मी बंडखोरी केलेली नाही. मुळात ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे तो शिक्षकांशी निगडित मतदारसंघ असल्याने इथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी म्हटले. (Vivek Kolhe is contesting as an Independent from Nashik teachers’ constituency.)

पक्ष विरहित उमेदवारी करावी, असा शिक्षकांचा आग्रह – विवेक कोल्हे
ते (Vivek Kolhe) पुढे म्हणाले की, यात उमेदवारी अपक्ष भरवण्याचा ठरवलं आहे. पक्ष विरहित उमेदवारी करावी, असा शिक्षकांचा आग्रह होता. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चर्चा अशी काही झालेली नाही. परंतु एक निवडणूक प्रक्रिया त्याचा हा भाग आहे. जी ती गोष्ट ज्या त्या वेळी झाली पाहिजे. कामाला लागण्यासाठी मी पहिले उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक लागल्यावर एक-एक मत महत्त्वाचे असते. एक-एक व्यक्ती महत्त्वाचा असतो. ज्यावेळी अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी (Vivek Kolhe) म्हटले आहे. दरम्यान, विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार या देखील उपस्थित होत्या.एक-एक व्यक्ती महत्त्वाचा असतो. ज्यावेळी अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार या देखील उपस्थित होत्या.

दरम्यान, किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात?
नाशिक विभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

10 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

13 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago