उत्तर महाराष्ट्र

जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई

नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा तास हे पाणी पुरेसे प्रमाणवेळ येत नाही. महानगर आणि स्मार्ट सिटी कंपनी 24 तास पाणी देण्याच्या वल्गना करीत आहेत. अशा वेळेस पाण्याचा स्त्रोत काय याचे उत्तर नाही. स्मार्ट सिटी कंपनी अतिशय बेजबाबदारपणे निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन काम करीत आहे. जवळपास पाच हजार नळ कनेक्शन बेकायदेशीर रित्या स्मार्ट कंपनी कडून देण्यात आलेले आहे.(Water scarcity in old Nashik division)

कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचा कर आकारणी न करता. महापालिकेच्या पाणी विभागाला न विचारता संमती यांना अशा कनेक्शन अदा करण्यात आलेले आहेत .असे दिसते व त्या पाण्याच्या वाश आऊट करणेअगोदरच सोडण्यात आलेल्या आहे ही गंभीर बाब आहे.

त्याचबरोबर दहा वर्षापूर्वी जुने नाशिक भागामध्ये चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी जवळ टाकी टू हा जलकुंभ जवळपास वीस दशलक्ष फूट पाण्याचा बांधण्यात आला. सदर जलकुंभ पाणी वितरणासाठी अद्यापही कार्यरत करण्यात आलेला नाही. कोट्यावधी रुपये महानगरपालिकेच्या करदात्याकडून सदरच्या जलकुंभावर खर्च करण्यात आलेले आहे. आणि अतिशय पाणीटंचाईच्या (Water scarcity) व कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्याच्या स्थितीत सदरचा जलकुंभ का चालू करण्यात आला नाही किंवा येत नाही याचा बोध होत नाही.

सदरच्या जलकुंभाचे व त्याच्या बांधकामाचे चौकशी का करण्यात येत नाही किंवा का करण्यात आली नाही याची चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने करीत आहोत. सरकारने व महापालिका प्रशासनाने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी व सदरचा जलकुंभ त्वरित कार्यान्वित करून जनतेला लाभ घ्यावा व 24 तास पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत.
राजेंद्र बागुल
मा. सभागृह नेता
मनपा
नासिक

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

1 week ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

1 week ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 week ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago