उत्तर महाराष्ट्र

जल जीवन’च्या कामांविरोधात आमदार खोसकर का झाले आक्रमक?

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन (Jal Jeevan) मिशन योजनेतून इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठ्याप्रमाणावर अनागोंदी सुरू असून ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. यामुळे या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, असा इशारा काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर ( MLA Khoskar) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी आमदार खोसकार ( MLA Khoskar) यांनी दिलेल्या पत्रात आपण निकृष्ट काम सुरू असलेल्या कामांची यादी दिल्यास त्यांची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे आमदार खोसकर ( MLA Khoskar) उपोषणाच्या मुद्यावर ठाम राहणार की निकृष्ट कामांची यादी सादर करणार आहे.(Why did MLA Khoskar become aggressive against the work of ‘Jal Jeevan’?)

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात १२२२ योजनांची कामे सुरू असून त्यातील ६८१ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून त्यांद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाकडून केला जात आहे.

दरम्यान काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या इगतपुरी-त्र्यबकेश्वर मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांची कामे ठेकेदारांकडून निकृष्टपणे सुरू असल्याची तक्रार, या पाणी पुरवठा योजनांच्या कामाच्या दर्जाविषयी वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. उलट ठेकेदार ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असूनही नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामुळे निकृष्ट काम करीत असलेल्या ठेकेदारांविरोधात दंडात्मक कारवाई करावी व या कामांचा दर्जा त्रयस्थ संस्थेकडून तपासण्याची मागणी आमदार खोसकर यांनी निवेदनात केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी या निवेदनानंतर आमदार खोसकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आमदार खोसकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले असून त्यात त्यांनी जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे कशा पद्धतीने केली जातात, याची सविस्तर माहिती दिली आहे.
या योजनेतील सर्व कामे ही टेंडर प्रक्रिया राबवून पात्र ठेकेदारांना दिली आहेत. तसेच प्रत्येक कामाची तीन टप्प्यांत त्रयस्थ्‌ संस्थेकडून तपासणी केली जाते व प्रत्येक टप्प्यावर त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केल्यानंतरच देयक दिले जाते.

या शिवाय कामे दर्जेदार होण्यासाठी जिल्हा परिषदेने एक ॲप तयार केले असून त्या ॲपमध्ये प्रत्येक कामाचे छायाचित्र, व्हिडिओ अपलोड करणे सक्तीचे असून त्याशिवाय ठेकेदारांना देयक दिले जात नाही. यामुळे आमदार खोसकर यांनी सरसकट सर्व कामे व ठेकेदार यांच्याविषयी तक्रार करण्यापेक्षा त्यांनी निकृष्ट कामांची माहिती दिल्यास त्या कामांची चौकशी करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे या पत्रानंतर आमदार खोसकर उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहतात कि निकृष्ट कामांची यादी देतात.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago