मराठा आरक्षणासाठी आता मोर्चा काढण्याची योग्य वेळ नाही : संभाजी राजे

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केला आहे. परंतु मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य नाही. मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाज आरक्षणसाठी पुन्हा मोर्चा काढणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आता मोर्चा काढण्याची योग्य वेळ नाही असे संभाजी राजे म्हणाले आहेत (Sambhaji Raje has said that now is not the right time to take out a morcha for Maratha reservation).

त्यासाठी मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कालच संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.

फोन टॅपिंग प्रकरणावरून रोहित पवार भडकले, भाजपाच्या आमदारांना सल्ला

चक्रीवादळापेक्षाही कोरोनाचे वादळ थांबवा; संजय राऊतांचा केंद्राला टोला

सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मी तसे ट्विट केले. आता सर्व लोकांशी सविस्तर चर्चा करुन मी माझी भूमिका मांडेन, असे संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असे ही संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी निक्षून सांगितले.

‘मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही’

मराठा आरक्षणाच्या समस्येवर मार्ग निघेल, याविषयी मी सकारात्मक आहे. मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझी यापूर्वीची भूमिकाही समंजस होती. सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो, असे छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी सांगितले.

As Indians turn to social media for Covid-19 help, online resources for smaller cities begin to grow

अनेक राजकीय पक्ष सध्या त्यांची भूमिका मांडत आहेत. परंतु, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) बराच अभ्यास केला आहे. 102 वी घटनादुरुस्ती, अॅटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही मी चर्चा करेन, असे संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी सांगितले.

मराठा मोर्चेकऱ्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रक काढून यासंदर्भातील घोषणा केली होती.

मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले होते.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

11 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

13 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

14 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago