महाराष्ट्र

OBC : ओबीसी संघर्ष समितीचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

टीम लय भारी

ठाणे : ओबीसी-व्हीजेएनटी (OBC-VJNT) प्रवर्गाच्या संविधानिक न्याय्य मागण्या मान्य करण्याबाबत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ओबीसी समाजाचे नेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे तहसीलदार कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्याचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना देण्यात आली. अशाच प्रकारचे आंदोलन मंगळवारी संपूर्ण राज्यात करण्यात आले.

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने 8 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर करून या समितीच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असून त्याचाच एक भाग म्हणून सदर निवेदन देण्यात आले, अशी माहिती ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.

ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी यापूर्वी 21 जुलै 2020 रोजी ऑनलाईन बैठक झाली. तसेच 9 ऑक्टोबर 2020 रोजी याच विषयावर सह्याद्री अतिथीगृहात अनेक मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करून यात ठरल्याप्रमाणे पुढील मंत्रीमंडळ बैठकीत ओबीसींचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. तरी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शासनाला दिलेल्या निवेदनात काही नवीन मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढील जनगणना जातनिहाय करण्यात यावी, ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा व भरती प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात याव्यात, आदी मागण्यांचा यात समावेश आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago