अरे बापरे! जव्हार आश्रमशाळेतल्या 37 विद्यार्थ्यांसह 72 जणांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

पालघर : जव्हार तालुक्यातल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व केंद्रीय स्वयंपाक गृहातील कर्मचारी वर्गाला कोरोनाची बाधा (Corona) झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. जव्हार तालुक्यात एकूण 72 रुग्ण आढळून आले आहेत.

हिरडपाडा शासकीय आश्रमशाळेतील 37 विद्यार्थी, 3 शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सरकारी केंद्रीय स्वयंपाक गृहात काम करत असलेले 16 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. याचबरोबर जव्हार नगर परिषद हद्दीतही 9 रुग्ण आढळून आले. गेल्या दोन चार दिवसात हे रुग्ण आढळले आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने जव्हार तालुका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.

हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता दहावी ते बारावी वर्गात शिकत असलेल्या 9 विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांची कोरोना तपासणी केली असता सर्वांना बाधा झाल्याचे आढळून आले. तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी असे 40 रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

12 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

13 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

13 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

14 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

16 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

16 hours ago