महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात फक्त ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा !

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या शहरात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे. या परिस्थिती राज्यासमोर अजून एक नविन आव्हान उभे राहिले आहे. मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६  दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोना काळात राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असे ही शिंगणे यांनी म्हटले आहे.

तूर्तास लॉकडाऊन नाही

राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यात २ एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांनी सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

बुधवारी राज्यात कोरोनाचा विस्फोट

राज्यात काल दिवसभरात राज्यात तब्बल ३९५४४  नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल २२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३४ टक्के असून मृत्यूदर १.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८१ लाख २ हजार ९८० वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत २  कोटी ४०  लाख ७२७  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

25 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

44 mins ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago