महाराष्ट्र

कार्यालयात आता केवळ ५०% कर्मचाऱ्यांची उपस्थिती

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईत मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच काही ठिकाणी लॉकडाउन करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. म्हणून राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खाजगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा आणि आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

सर्वसामान्यांसाठी लोकल, बाजारपेठा, हॉटेल, बार, रेस्टॅारन्ट, नाईटक्लब इत्यादी सार्वजनिक ठिकाणांवरील निर्बंध शिथील केले. परंतु यावेळी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळणे बंधनकारक होते. याकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सध्या मिनी कंटेनमेंट संकल्पनेवर आधारीत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये  प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग तसेच कार्यालय प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असे ही या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे तसेच सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असे ही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

7 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

8 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

9 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

9 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

10 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

10 hours ago