महाराष्ट्र

मोदी सरकारच्या फाजिलपणामुळे ऑक्सिजन तुटवडा, पृथ्वीराज चव्हाणांनी डागली तोफ

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मोदी सरकारच्या फाजिलपणामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत (Prithviraj Chavan has said that the Modi government’s extravagance has created a shortage of oxygen).

संपूर्ण देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे (The central government is solely responsible for the dire situation created by the lack of oxygen in the country). केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

शरद पवारांची देखील ओळख आहे, अजित पवारांचा सुजय विखेंना टोला

पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, “वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही (No shortage of oxygen was felt) आणि आता देखील जाणवणार नाही.”

केंद्रीय आरोग्य सचिव देशात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे (The country is trying to increase the medical oxygen supply) असे ते म्हणाले होते. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते की, केंद्र शासनाने देशभरातील 390 दवाखान्यात PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच, कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने 1 लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Covid-19: When images of cremations are beamed, does this break a sacred taboo?

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की, सरकारने अतिरिक्त 1 लाख MT ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे (The country is facing an unprecedented oxygen shortage).

ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखान्यातून रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे (News of patients dying due to lack of oxygen is coming across the country). ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे. देशात ही परिस्थिती केंद्र सरकारमुळे निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत

  • ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत” हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता?
  • 1 लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयातीचे काय झाले? 5 महिन्यात ते का आयात केले नाही? ही प्रक्रिया कोणी थांबवली?
  • आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या 162 PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त 33 दवाखान्यातच उभा केले आहेत, आणि त्यापैकी महाराष्ट्रात फक्त एक प्लॅन्ट उभारला आहे. हे खरे आहे का?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना “भारताने कोरोनाला कसे हरवले” अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे.

जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.

आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत (Those whose relatives died due to lack of oxygen want answers). देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

Rasika Jadhav

Recent Posts

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

12 mins ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

3 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

20 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

21 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

22 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

23 hours ago