महाराष्ट्र

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आरटीई प्रवेश ( RTE admissions) प्रक्रियेत राज्य शासनाने केलेल्या बदलाला पालकांनी विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून रखडेलेली प्रवेश प्रक्रिया आता शुक्रवारापसून पुन्हा सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी पालकांकडून उत्स्पूर्त प्रतिसाद (Parents’ enthusiastic response) मिळाला आहे.(Parents’ enthusiastic response to RTE admissions)

पालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार न्यायालयाने शासनाच्या निर्णायाला स्थगिती दिल्यानंतरत राज्यात आता आरटीई प्रवेश ( RTE admissions) प्रक्रिया नव्याने सुरु झाली असून ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आरटीई प्रवेश ( RTE admissions) प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांवर जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.

पहिल्याच दिवशी पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद
आरटीई प्रवेशासाठी ( RTE admissions) राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या नवीन आदेशानुसार विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील असलेल्या अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाणार होता. म्हणजेच खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार नाही असे सांगण्यात आले होते. परंतु शासनाच्या या निर्णयाला पालकांनी विरोध दर्शवला होता. श्रीमंत मुलांसाठी इंग्रजी माध्यमांची खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी या निर्णयामुळे झाली असती. त्यामुळे त्याविरोधात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालकांच्या याचिकेवर सुनावणींनंणीं नंतर न्यायालयाने शासनाच्या बदललेल्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांना देखील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरटीईअंतर्गत 24 टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे 17 मे रोजी पुण्यातील 5 हजार पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यभरातून 23 हजार 536 अर्ज जमा प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज हे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून प्राप्त झाले आहेत. शुक्रवारी पुण्यातून 5 हजार 319 अर्ज प्राप्त झाले आहेत.

RTE प्रवेशासाठी  ही पात्रता आवश्यक
महाराष्ट्रा च्या RTE प्रवेश 2024 साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. RTE अंतर्गत पात्र असल्यास तुम्ही अर्ज करू शकता.
तुमचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
केवळ वंचित किंवा कमी उत्पन्न असलेल्या गटातील मुलेच अर्ज करू शकतात.
पालकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असा

RTE प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
विद्यार्थ्याचे जन्मतारीख प्रमाणपत्र (Student’s Date of Birth Certificate)
विद्यार्थ्याचे आधार कार्ड (Student’s Aadhar Card)
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो (Recent Passport Size Photo of the Student)
जातीचा दाखला (Caste Certificate)
पालकांचे आधार कार्ड (Parents’ Aadhar Card)

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

47 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago