महाराष्ट्र

पवारांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन…

टीम लय भारी

मुंबई :- अजित पवार यांनी बुधवारी पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणे त्यांच्या लोकांनी थांबवले होते. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असे सांगितले होते. आता हे थांबले नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

अजित पवार यांनी बुधवारी पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसेच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचे काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.

‘चंद्रकांत पाटलांनी साधी ‘टरबूज खरबूज’ सोसायटीही चालवलेली नाही; मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस’

चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणे नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली होती.

चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणे नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

8 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 hours ago