महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनाने देशाला वाचवले,आता असंघटित कामगार व कर्मचारी यांनी देशाला वाचवावे – डॉ.उदित राज

टीम लय भारी 

भाजपा सरकार च्या काळात अन्याय अत्याचाराविरोधात जी आंदोलने झाली ती सर्व आंदोलने चिरडून टाकण्यात आली.केवळ शेतकरी   आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले.त्या आंदोलनानुळे किसान विरोधी कायदे,कामगार विरोधी कायदे सरकारला मागे घ्यावे लागले.एकंदरीत संविधान विरोधी काम करणार्यांपासुन देशाला वाचविण्याचे काम किसान आंदोलनाने केले आहे.त्यामुळे या पुढील जबाबदारी सुमारे ४० कोटी असंघटित कामगार तसेच कर्मचारी यांची असल्याचे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती संघटनांचा अखिल भारतीय परीसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ.उदित राज यांनी केले.परिसंघाच्या वतीने आयोजित हॉटेल रंगशारदा,मुंबई येथील चिंतन बैठकीत ते बोलत होते.

परिसंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी परिसंघाच्या कामकाजाचा आढावा घेत असताना,महाराष्ट्रातील सर्व छोट्या-मोठ्या संघटनांनी स्वतंत्र पणे न लढता परिसंघाला संलग्न होऊन एक मोठा लढा ऊभारावा असे आवाहन केले. कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा,सुनिल झोडे,प्रितम आठवले,जॉन मोझेस ईगुरी,आर.डी.सोनकर,सिध्दार्थ कांबळे,सुबोध पवार,ज्ञानदेव कोरी आदीनी आपले विचार मांडले.

Pratiksha Pawar

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

13 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

4 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago