महाराष्ट्र

भाजप नगरसेवकाला ‘या’ कारणामुळे पोलिसांनी झोडपले

टीम लय भारी

पिंपरी चिंचवड : सर्वत्र कोरोनाचा प्रकोप वाढत असताना खबरदारीचा उपाय केल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. परंतु पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकाचा अजब प्रकार समोर आला. नगरसेवक महाशयांनी गुटखा खाऊन थुंकणाल्याप्रकरणी पोलिसांनी चांगलेच बदडले. ह्या प्रकारानंतर नगरसेवकाने पोलिसांशी माफी मागितल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

कोरोनामुळे सर्वत्र साफसफाई व आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. जाहिरातींच्या माध्यमातून सरकारतर्फे तसेच  सेलिब्रेटी,डॉक्टर,पोलीस,महापालिका,नगरपालिका, ग्रामपंचायतर्फे साफसफाईवर विशेष काळजी घेतली आहे. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा नगरसेवकाचा आडमुठेपणा समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक संचारबंदी असूनही चार-पाच कार्यकर्त्यांना गाडीत घेऊन फिरणाऱ्या या नगरसेवकाला पिंपळे सौदागरमधील शिवार चौकात पोलिसांनी पकडले. त्यावेळी गुटखा खात असलेला हा नगरसेवक गाडीतून उतरला आणि थेट पोलिसांसमोर रस्त्यावर थुंकला. ‘कोरोना’चा फैलाव उघड्यावर थुंकणे, शिंकणे यातून होत असल्यामुळे पोलिस विशेष दक्षता बाळगत आहेत. ही बाब सहन न झालेल्या पोलिसांनी त्या नगरसेवकाला काठ्यांनी चांगलेच झोडपले.

नगरेसवकाला पोलिसांनी ठाण्यात नेऊन नगरसेवकाला नोटीस बजावली. त्यानंतर सांगवी पोलिसांची माफी मागितल्यानंतर या नगरसेवकाची सुटका केली. ह्या प्रकारामुळे चांगलीच चर्चा रंगली असून पोलिसांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.

 

 

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

5 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

5 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

6 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

6 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

7 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

9 hours ago