महाराष्ट्र

प्रियांका गांधींची नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांत टीका

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात थैमान घातला आहे. लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. या दरम्यान लसीच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केल्या. अनेक ठिकाणी तर लसींच्या तुटवड्यामुळे काही काळ लसीकरण (Vaccination) मोहीम स्थगित देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांमध्ये टीका केली आहे (Priyanka Gandhi has slammed Prime Minister Narendra Modi over his vaccination campaign).

तसेच, इतर देशांना हे जमले, तर आपल्याला हे का जमू शकले नाही? असा परखड सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Minister Narendra Modi) यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या घोषणेची देखील आठवण प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) करून दिली आहे.

भविष्यवाणी खरी ठरत नसल्यानं भाजपा नेते हताश, त्यामुळेच तारीख पे तारीख; नवाब मलिकांचा टोला

“तोल ढासळलेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतात”;संजय राऊतांची चंद्रकांत पाटीलांना बोचरी टिका

Coronavirus: Why start vaccination centres amid shortage of Covaxin doses, HC asks Delhi government

ट्वीटरवर व्हिडीओ केला पोस्ट!

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपला एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील सध्याच्या लसीकरण (Vaccination) मोहिमेविषयी माहिती दिली आहे. “केंद्राने (लस खरेदी, वितरणाबाबत) सुरुवातीला सर्व जबाबदारी घेतली. पण जशी कोरोनाची दुसरी लाट देशात सुरू झाली, तसे केंद्र सरकारने ही जबाबदारी राज्य सरकारांकडे द्यायला सुरुवात केली. जर्मनी, अमेरिका या देशांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा स्वीकार केला. तिथे केंद्र सकरारने लसी खरेदी केल्या आणि राज्यांना त्या लसी फक्त वितरीत करण्याची जबाबदारी दिली. पण मग मोदी सरकारने असे का केले नाही?” असा सवाल प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उपस्थित केला आहे.

फक्त ३.४ टक्के लोकसंख्येलाच लसीकरण!

“भारत हा जगात लसींचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. परंतु, तरीही आज देशातली फक्त ३.४ टक्के लोकसंख्या पूर्णपणे लसीकृत आहे. भारताच्या या अशा संभ्रमित आणि अनिश्चित लसीकरण (Vaccination) मोहिमेसाठी कोण जबाबदार आहे?”, असा परखड सवाल प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उपस्थित केला आहे.

‘त्या’ घोषणेचे काय झाले?

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२० रोजी ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या मध्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Minister Narendra Modi) देशवासियांना संबोधित करताना केलेल्या घोषणेची आठवण यावेळी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी करून दिली आहे. “१५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Minister Narendra Modi) जाहीर केले की प्रत्येक भारतीयाला पुढच्या वर्षापर्यंत लसीकृत करण्याची आपली योजना तयार आहे. पण आता आपण २०२१ च्या मध्यापर्यंत आलो आहोत. सध्या आपले लसीकरणाचे (Vaccination) प्रमाण प्रतिदिन जवळपास १९ लाख डोसचे आहे. पंतप्रधानांनी दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण दिवसाला किमान ७० ते ८० लाख लोकांना लस द्यायला हवी”, असे प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago