प्राध्यापकाने केली विद्यार्थीनीकडे ‘सेक्स’ची मागणी!

लयभारी नेटवर्क

अहमदनगर : नांदेडमध्ये सहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. तसेच मुंबईच्या घाटकोपरमध्ये गुण वाढवून देतो असे सांगत प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केली होती. या घटना ताज्या असताना अहमदनगरमध्ये प्राध्यपकाने विद्यार्थीनीला परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगत सेक्सची मागणी केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे असे सांगून बारावीतील विद्यार्थीनीकडे प्राध्यापकाने शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात घडला आहे. या प्रकरणी प्राध्यापक बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) याच्याविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या आईच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी वर्गात असताना प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी असा प्रकार केला होता. घडलेला प्रकार मुलीने आला सांगितला होता. मुलगी व नातेवाइकांनी महाविद्यालयात येऊन प्राचार्यांकडे तक्रार केली होती. परंतु प्राध्यापकाने मुलीची माफी मागितली होती. असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लेखी ही प्राचार्यांना दिले होते. परंतु हा प्रकार इतर विद्यार्थीनींच्या पालकांना समजला होता.

गावात ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थ महाविद्यालयात जमले होते. बुधवारी सकाळी ग्रामस्थ हे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गेले होते. प्राध्यापकाविरुध्द गुन्हा नोंदविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून प्राध्यापकाविरुध्द बुधवारी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्राध्यापक हा गावातून फरार झाला आहे.

या प्रकरणी बुधवारी प्राध्यापकाविरुध्द विनयभंग करणे, अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्राध्यापक फरार झाला आहे. गाव बंद ठेवून ग्रामस्थ पोलिस स्टेशनला गेले होते. त्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय आहे विद्यार्थीनीचा आरोप…

इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे असे सांगून बारावीतील विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने शरिरसुखाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे. हा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात घडला आहे. या प्रकरणी प्राध्यापक बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) याच्याविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

राजीक खान

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

12 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

12 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

13 hours ago