महाराष्ट्र

महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मोकळा

पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकांच्या लगतचे क्षेत्र महात्मा फुले वाडा स्मारक ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण विस्तारीकरण म्हणून आरक्षित करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्मारक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागून या दोन्ही स्मारकांच्या विस्तारीकरणासह विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकांच्या लगतचे क्षेत्र महात्मा फुले वाडा स्मारक ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण विस्तारीकरण म्हणून आरक्षित करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाकडून महात्मा फुले वाडा स्मारक ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण विस्तारीकरण म्हणून आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. सदर स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले आहेत. महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे.

मंजुर विकास आराखड्यानुसार महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही स्मारके सार्वजनिक-निमसार्वजनिक विभागात समाविष्ट आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) (क) (क) नुसार महात्मा फुलेवाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण विस्तारीकरण आरक्षण प्रस्तावित केले आहे. सदर दोन्ही स्मारकाचे जतन व विकसन होण्याच्या दृष्टीने दोन्ही स्मारकाच्या सभोवतालचा भाग टि.पी. स्किम व गावठाणातील भागाचे भूसंपादन होऊन विकसन होण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) (क) (क) नुसारची कार्यवाही करण्यासाठी अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील जा.क्र. टीपीएस-१८२० / अनौसं- १७/ प्र.क्र.११३/ २०२० / कलम ३७ (१कक) / नवि-१३. दि. २५/ ११ / २०२१ अन्वये शासन सूचना प्रसिद्ध केली असून हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. तसेच कलम ३७ (१) (क) (क) अन्वये विहित केलेली वैधानिक कार्यवाही पुर्ण करुन शासनास अहवाल सादर करण्याकरिता सह संचालक, नगररचना, पुणे विभाग यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते.

सदर दोन्ही स्मारकाचे जतन व विकसन होण्याच्या दृष्टीने दोन्ही स्मारकाच्या सभोवतालचा भाग टि.पी. स्किम व गावठाणातील भागाचे भूसंपादन होऊन विकसन होण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) (क) (क) नुसारची कार्यवाही करण्याचे नियोजित असल्याने आता संपूर्ण परिसराचे नव्याने भूसंपादन करणे आवश्यक आहे. कलम ३७ (१) (क) (क) अन्वये आरक्षण बदल झाल्यामुळे भूसंपादनाचे काम करणे शक्य होणार आहे. या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते व अतिमहत्वाच्या व्यक्ती भेटी देण्यासाठी येत असतात. मात्र वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत होती. आता मात्र लवकरच येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन महात्मा फुले वाडा स्मारक ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांच्या विस्तारीकरणासह विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

1 day ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago