महाराष्ट्र

राहुल गांधीनी पंतप्रधान मोंदींना लिहिले पत्र, मांडला महत्त्वाचा मुद्दा

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे (Former Congress president Rahul Gandhi on Friday wrote a letter to Prime Minister Narendra Modi).

कोरोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची विनंती ही राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे (Rahul Gandhi has requested the Prime Minister to make the vaccine available to Indian citizens as soon as possible).

पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, चव्हाणाचं फडणवीसांना प्रत्युत्तर

पंतप्रधानांचं निवासस्थान, नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकला, पवारांचा टोला

Bengaluru is reaching a Covid-19 crisis point. How did it get there?

केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा आरोपही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षासारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामाना करावा लागू नये यासाठी तत्काळ आर्थिक मदत पोहचवण्यात यावी, असे ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे.

‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आलीय कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात अडकला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपले सर्वात जास्त प्राधान्य असायला हवे. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे’, असे ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या पत्रात म्हटले आहे.

‘जगातील प्रत्येक सहा लोकांमध्ये एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात विषाणूला आपले स्वरूप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते, हे या महामारीतून धडधडीतपणे समोर आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता करोना विषाणूचे ‘दुहेरी उत्परिवर्तन’ आणि ‘तिहेरी उत्परिवर्तन’ ही सुरुवात असू शकते, अशी मला भीती वाटते. या विषाणूचे अनियंत्रितरित्या प्रसार होणे हे केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकते’ अशी भीती ही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) व्यक्त केली आहे.

सोबतच, ‘हा विषाणू आणि त्याच्या विविध प्रकारांची वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हायला हवा. विषाणूच्या उत्परिवर्तनाविरूद्ध लसींच्या प्रभावाचे मूल्यांकन केले जावे. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवे. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी’ असा सल्ला ही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) दिला आहे.

केंद्र सरकारकडे कोविड विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम  राबवण्यासाठी कोणतीही स्पष्ट रणनीती नसल्याचाा आरोपही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला आहे. महामारीवर विजय मिळवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जात होती तेव्हा व्हायरस आणखीनेच तेजीने फैलावत होता, असे ही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) म्हटले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago