महाराष्ट्र

हवामानातील बदलामुळे पाऊस लांबणीवर 23 जूननंतर पावसाची शक्यता; शेतकरी राजा चिंतेत

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट अजूनही देशाच्या किनारपट्टीवर आहे. चक्रीवादळामुळे पावसाला उशिरा झाला आहे. गुजरातला धडकलेल्या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह देशाच्या हवामानावर बदल झाला. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन अशी परिस्थिती दिसत आहे. 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. असे हवामान खात्याने सांगितले आहे.दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या सरीची सुरुवात होणार आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला नाही तर पुढील आठवड्यात किती पाऊस पडेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चक्रीवादळामुळे पाऊस रखडला गेला आहे. पाऊसावर बळीराजाचं पोट भरत पण सध्या त्याने गडीच मारली आहे. पाऊस लांबल्यामुळे बळीराजा चिंतेत असून नागरिकांची निराशा झाली आहे. अनेक भागात मान्सून अजून दाखल झालेला नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडला नाही. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ हे राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. एएनआय (ANI)शी बोलताना डॉ मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, IMD म्हणाले, “चक्रीवादळ बिपरजॉय एका खोल उदासीनतेत कमकुवत झाले. ते पूर्व-उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे. दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या लगतच्या भागात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्येच पाऊस पडत आहे. या चक्रीवादळाशी मान्सूनचा काहीही संबंध नाही.

हे सुध्दा वाचा :

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

शेलार साहेब शांत व्हा, मानसिक संतुलन ढळू देऊ नका! सावरकरप्रकरणी भाजपा-कॉंग्रेसमध्ये ट्विटर युद्ध

जबरा फॅन! ऋतुराजला भेटण्यासाठी चाहत्याची थेट मेदानात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

बिपरजॉय चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या कच्छ आणि जाखाऊ बंदराला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेणार आहेत. ते प्रथम बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण देखील करतील.

रसिका येरम

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

10 mins ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

14 mins ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

21 mins ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

36 mins ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

46 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

1 hour ago