बिपरजॉय चक्रिवादळामुळे हवामानात बदल झाला असून या बदलामुळे मुंबई,ठाणे व राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. मुंबई,ठाणे,पालघर या परिसरात पावसाला पहाटेपासून सुरवात झाली असून मुंबईसह उपनगरात मंगळवार संध्याकाळपासून पावसाची रिमझिम पहायला मिळत आहे.ठाणे जिल्हातील अनेक भागात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाच्या आगमणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. विदर्भात मात्र पावसाची प्रतिक्षा कायम आहे. वसई विरारमध्ये ढगाळ वातावरण असून कालपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच विरार पूर्व, विवा जहांगीड परिसरात ऋषी विहार समोर फांद्या तुटल्या आहेत.महापालिकेने पावसाळ्यापुर्वी झाडांच्या फांद्या तोडल्या नसल्यामुळे पावसात या फांद्या तुटुन पडल्या आहेत या मध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही.
पालघर जिल्ह्यामध्ये सुध्दा पावसाने जोरदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस पहायला मिळत आहे. डहाणू,तलासरी परीसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी आज आणि उद्या पावसाची हजेरी कायम राहणार आहे.
हे सुध्दा वाचा:
येवा टोल आपलोच असा , ओसरगावमधील टोलनाक्यावरुन वाद, नेमकं काय आहे प्रकरण
मुंब्रा धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेशचा सरकारचा बदनामीचा कट; डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
चंद्रकांत पाटलांचे मोठे पाऊल, महाविद्यालातून मिळणार शेअर बाजाराचे प्रशिक्षण !
केरळ,दक्षिण कर्नाटक किनारपट्टी व कोकण किनारपट्टीवर पावसाचे ढग दाटून आले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे तळकोकणातही सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. कु़डाळ,कणकवली,सांवतवाडी तालुक्यातही पावसाची रिमझिम सुरु आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातही पावसाने गडगडाटासह हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे यांमुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…