महाराष्ट्र

राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हवे होते; नरेंद्र मोदींचेही केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई : राम मंदिराचा शुभारंभ पाहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ( Raj Thackeray reacted on Ram Mandir ).

राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी केले असून त्यात राम मंदिराच्या शुभारंभाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिर उभारण्याबाबतची न्यायालयीन लढाई, तसेच सर्व सहमती घडवून आणण्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारचे योगदान मोठे असल्याचे सांगत राज यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे.

राज ठाकरेंनी पत्रक जारी करून राम मंदिराबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

राज ठाकरे म्हणतात की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं. ते प्रतीक आहे, कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता. त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला. आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.

अर्थात या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.

सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे, असे राज यांनी पत्रकात म्हटले आहे.

तुषार खरात

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

2 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

4 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

5 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago