महाराष्ट्र

राजेश टोपेंनी लॉकडाऊनवाढीचे दिले संकेत

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  सरकारने लागू केले कडक निर्बंध १५ मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत. परंतु १५ मेनंतर निर्बंध उठणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनवाढीचे संकेत दिले आहेत (State Health Minister Rajesh Tope has signaled an increase in lockdowns).

राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असे विधान राजेश टोपे (Rajesh Top) यांनी केले आहे.

मराठा उमेदवारांना अतिविलंब न करता त्वरित शासकीय सेवेत सामावून घ्या; छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणून घेणाऱ्या देशावर ही वेळ आली; शिवसेनेची मोदींवर खोचक टीका

Coronavirus: India records 4,187 deaths in a day for the first time, over 4 lakh new cases

“राज्यात रोज ५० हजारांच्यावरच रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल”, असे राजेश टोपे (Rajesh Top) म्हणाले आहेत.

राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी देखील तयारी करत असल्याचे टोपे यांनी सांगितले. बेड्स वाढवणे, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने ही सरकार प्रयत्नशील आहे, असे राजेश टोपे (Rajesh Top) म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago