Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी त्रस्त जनतेला दिला दिलासा, मतदारसंघात घेतला मोठा निर्णय

टीम लय भारी

जामखेड : गेल्या दोन महिन्यांपासून जामखेड शहर हॉटपॉस्ट होते. प्रशासनाने अतिशय सतर्कतने कोरोनाविरोधातली लढाई जिंकत जामखेडला कोरोनामुक्त केले. त्यानंतर आता आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या पुढाकारातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जामखेडमधील जनतेला दिलासा मिळणार आहे.

जामखेडचा हॉटस्पॉट उठवला गेल्यामुळे शहराची थांबलेली आर्थिक गती सुरळीत करण्यासाठी जामखेडची बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अधिक दक्षतेने शासनाच्या सुचनांचे पालन केल्यास बाजारपेठ सुरळीत चालू शकेल म्हणूनच नागरिकांनी जास्तीचे सहकार्य करावे असे अवाहन आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यात सलग तीन वेळा हॉटस्पॉट ठरलेल्या जामखेडची बाजारपेठ गेल्या दीड दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात व्यापारी, नागरिक आणि शेतकरी यांना प्रचंड हाल सहन करावे लागले होते.

छोटे मोठे व्यवसाय सुरू करून पुन्हा काही प्रमाणात अर्थचक्र सुरळीत चालू करण्यासाठी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी जामखेड मधील व्यावसायिक ,प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी हे उपस्थित होते.

शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीला अधिन राहून बाजारपेठ सुरू करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी पिण्याचे पाणी, भाजीपाला आणि वीजपुरवठा तसेच पुणे मुंबईहून आलेल्या नागरिकांबाबत अधिक काळजी घेण्याबाबत सुचना केल्या.

यावेळी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.युवराज खराडे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे,प्रकाश काळे,विजयसिंह गोलेकर, प्रा राहुल अहिरे सह आदी उपस्थित होते.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane : निलेश राणेंना तृतीयपंथियाने भरला दम, ‘बाजार उठविण्याची’ दिली तंबी

Rane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या पातळीवरील टीका

Rohit Pawar lends helping hand to Maharashtra COVID-19

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

14 hours ago