महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे झाला समृद्धी महामार्गावर ‘त्या’ बसचा अपघात; फॉरेन्सिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. 1 जुलैच्या मध्यरात्री साधारणत: 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्याजवळ टायर फुटून झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेचा मुंबईच्या फॉरेन्सिक फायर अॅण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास केला. या तपासानंतर तो अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात आगीचे खरं कारण समोर आलं आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघात झाला तेव्हा बसमध्ये 350 लिटर डिझेल होते. अपघाताच्या वेळेला बसचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर होता. अपघातग्रस्त बस साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर आली. अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओव्हरटेकिंग लेनमध्ये धावत होती. अपघातग्रस्त बसचं समोरचं चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डाला धडकलं. त्यानंतर समोरचं चाक दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी कॉंक्रिटच्या दुभाजकाला धडकलं. याच दुभाजकाला बसचा पाठीमागचं चाकही त्याच पद्धतीने धडकलं आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. बसचं मागचं चाक जेव्हा आरसीसी कॉंक्रिट दुभाजकाला धडकलं तेव्हाही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडकळीस आली.

चालकाच्या बाजूच्या समोरच्या आणि मागच्या चाकाची दुभाजकाला धडक झाल्यानंतर बस एका बाजूला झुकली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य दरवाजा खाली दाबला गेला. या अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली. यावेळी बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन डिझेल टॅंक वर आदळला. डिझेल टॅंक फुटल्यामुळे उडालेले हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि त्यामुळे बसने पेट घेतला.

हे सुध्दा वाचा:

आमची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ – जयंत पाटील

संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत निर्णय देऊ- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्षांविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर 7 महिन्यात या महामार्गावर 18 अपघात होऊन 300 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळेच या मृत्यू मार्गावर वाहने सावकाश चालवा असे आवाहन सरकार करत आहे. या महामार्गावर जनावरे आडवी येण्याने, वाहन चालकाच्या हलगर्जीने अपघात होत आहेत.

रसिका येरम

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

30 mins ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

43 mins ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

1 hour ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

2 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

4 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

4 hours ago