महाराष्ट्र

बुलढाणा अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल; ट्विट करत व्यक्त केला शोक

समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खासगी बसचा अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत आणि जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधान ‘राष्ट्रीय मदत निधीतून’ जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी फोनवर संपर्क साधून या घटनेची चौकशी केली. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार पुरवण्याचे आदेश दिले असे मुख्यमंत्री यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपघातस्थळी दाखल होणार आहेत.

या अपघाताविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रोड कन्सट्र्क्शन’ हे बसच्या अपघताचे कारण नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मानवी चुका किंवा वाहनांमधील बिघाडामुळे हे अपघात होत असतात या बाबत चालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचचे ते म्हणाले. डिझेलची टाकी फुटल्यामुळे बस पेटल्याचे ही त्यांनी सांगितले. या अपघातात होरपळून निघालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत अपघतात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,” अस म्हणत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या बरोबरच समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा:

समृध्दीवर अपघाताचे सत्र सुरूच; बुलढाण्याजवळ अपघातात 25 प्रवासी ठार

वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी…; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे ट्विट

ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट; नाना पटोले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मोनाली निचिते

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

6 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago