महाराष्ट्र

संजय राऊतांचा बंडखोरांना टोला, ५० कोटी पचणार नाहीत

टीम लय भारी

नाशिक : शिवसेना पक्षाला भगदाड पडल्यानंतर शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत आहेत. या कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे मार्गदर्शन करत आहेत. आज (दि. ९ जुलै २०२२) शिवसेनेकडून नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोरांना टोले लगावले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी बंडखोरांना ५० कोटी पचणार नाहीत, अशी खोचक टीका केली.

सगळे असली शिवसैनिक इथे
शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार स्वतःला खरे शिवसैनिक बोलत आहेत. शिवसेना ही त्यांची असल्याचे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. इतकेच काय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बंडखोरी केलेले आमदार हे शिवसेनेचेच असल्याचे लोकांना पटवून देत आहेत. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी बंडखोरांना टोला लगावत खरे शिवसैनिक इथे असल्याचे सांगितले आहे.

इथे असली-नकली, खरे-खोटे चालत नाही. जे काही आहे ते इथेच आहे. शिवसेना हि बाळासाहेबांची आहे. बाळासाहेब आमचे बाप आहेत आणि त्यामुळे आमची शिवसेना खरी आहे. या मेळाव्यात असलेले लोक ५० खोक्या वाले नाहीत, असाही टोला यावेळी संजय राऊत यांनी बंडखोरांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसला
ज्यावेळी या बंडखोरांनी शिवसेनेशी गद्दारी केली तेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते. त्याचवेळी बंडखोरांनी कोणताही विचार न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेशी गद्दारी करण्यासाठी त्यांनी १० कारण दिली असेही संजय राऊत यांनी सांगितले.

बंडखोरांनी आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंडखोरी केल्याचे सांगितले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस निधी देत नाही असे सांगितले, मग उद्धव ठाकरे हे वेळ देत नसल्याचे सांगितले. म्हणजे दर दिवशी बंडखोरांची कारणे बदलत होती. पण ४० जणांनी बंडखोरी का केली, याचे कारण लवकरच समोर आणू असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मी कोणालाही घाबरत नाही. कोणाचाही ससेमिरा मागे लावा. मरण पत्करेल पण शरण जाणार नाही. आम्ही पक्षासाठी, ठाकरेंची, महाराष्ट्रासाठी तुरुंगात जाऊ, असेही यावेळी त्यांनी सांगितले. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे कधी भले झाले नाही आणि होणारही नाही. बंडखोरांनी खोके घेतले म्हणून त्यांना झोप येतेय असेही नाहीये, असे खडेबोल त्यांनी यावेळी बंडखोरी केलेल्या आमदारांना सुनावले.

हे सुद्धा वाचा :

VIDEO : भाजपकडून अतिरेक्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातोय, काँग्रेसचा आरोप

एकनाथ शिंदेंचा विचित्र निर्णय, सधन वर्गाला खुष करण्यासाठी वंचितांना चिरडले

चित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

6 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

42 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

24 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago