महाराष्ट्र

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

टीम लय भारी

मुंबई :- माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता (Eknath Gaikwad was infected with corona). त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचे  निधन झाले (He died of corona). शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील (Eknath Gaikwad will be cremated at Chandanwadi Cemetery), अशी माहिती आहे.

एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते (Eknath Gaikwad was a former Congress president of Mumbai). राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले एकनाथ गायकवाड विक्रोळीत राहत होते (Eknath Gaikwad was living in Vikhroli). पण, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते.

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचे सख्य होते (Although Eknath Gaikwad was in the Congress, he was allied with the Dalit movement). दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

शरद पवारांची देखील ओळख आहे, अजित पवारांचा सुजय विखेला टोला

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

LG Anil Baijal is now ‘government’ in Delhi as Centre notifies law giving him more power

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता (Eknath Gaikwad had defeated Shiv Sena leader and former Lok Sabha Speaker Manohar Joshi from South Central Mumbai constituency). जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. पण, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.

राहुल गांधींसाठी एकनाथ गायकवाड यांनी दिलेला जामीन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केले होते. 15 हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलेले. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली होती (Former Congress MP from Mumbai Eknath Gaikwad had given a guarantee in court for Rahul Gandhi).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

21 mins ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

18 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

19 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

20 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

21 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

21 hours ago