महाराष्ट्र

शरद पवारांनी घरीच घेतली दुसरी कोरोना लस

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शरद पवारांनी त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी कोरोनाची दुसरी लस घेतली. ही लस घेताना डॉ. तात्याराव लहाने, परिचारीका आणि डॉक्टर उपस्थिती होते.  शरद पवार यांनी १ मार्चला कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. साधारण महिनाभरानंतर शरद पवारांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. को शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी घरीच कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

“आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपण ही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

शरद पवारांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेतली लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १ मार्च कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली होती. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने ही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पोटदुखीचा त्रास झाला होता. यानंतर ३० मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. अखेर, आराम वाटू लागल्याने शनिवारी ३ एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह ते सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी परतले होते.

बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ ही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

पुन्हा शस्त्रक्रिया होणार

१५ दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

2 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

20 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

21 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

22 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

22 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

23 hours ago