महाराष्ट्र

शिंदे- फडणवीस सरकारने, महिन्याभरात केल्या 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात दररोज नवीन नवीन राजकीय घडामोडी घडत असतानाच आज चार सनदी (आय एस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. सचिनन्द्र प्रताप सिंह (2007) यांची अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएल, पुणे येथे , ओमप्रकाश बकोरिया(2006) यांची अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएल, पुणे येथून समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत नारनवरे(2009)समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची बदली महिला आणि बालकल्याण आयुक्त, पुणे येथे बदली झाली आहे. विमल. आर (2009) यांची महिला आणि बालकल्याण आयुक्त, पुणे येथून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. खादी व्हिलेज इंडस्ट्रीयल बोर्ड मुंबई येथे बदली झाली आहे. शिंदे- फडणवीस सरकारने महिन्याभरात 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सरकारला चांगलेच लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा विरोधकांमध्ये आहे.

सरकार बदलले की सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. गेल्या महिन्यात आठवड्याभरात सनदी अधिकाऱ्यांच्या तिसऱ्यांदा बदल्या करण्यात आल्या होत्या. एकूण 35 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे राधिका रस्तोगी यांची पाच दिवसांत बदली करण्यात आली होती.. 2 जून 2023 रोजी निघालेल्या बदली आदेशात रस्तोगी यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. यात राजेश कुमार यांची (R&R) R&FD चे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते ग्रामविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अनुप कुमार यांची शेती व ADF विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते सहकार आणि विपणन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. डॉ. राजागोपाळ देवरा यांची महसूल, नोंदणी, स्टॅम्प व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते विकास आयुक्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. असीम कुमार गुप्ता यांची नगर विकास खात्याचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते (R&R) R&FD विभागाचे प्रधान सचिव होते. राधिका रस्तोगी यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. संजय खंडारे यांची पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. एकनाथ डवले यांची ग्राम विकास खात्याचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते शेती व ADF विभागाचे प्रधान सचिव होते. सौरभ विजय यांची नियोजन विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. ते पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव होते. आर. एस. जगताप यांची YASHADA चे उपमहासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

त्यानंतर जुनमध्येच अनिल डिग्गीकर, सिडकोचे उपाध्यक्ष, मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग खाते, डॉ. के. गोविंदाराज, नगरविकास खाते (2), डॉ. संजय मुखर्जी, MMRDA आयुक्त, आशिष शर्मा, अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, नंतर पुन्हा 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. महिला व बाल विकास विकास विभागाच्या प्रधान सचिव इड्जेस कुंदन यांची अल्पसंख्याक विकास भागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. या पदावर अनुप कुमार यादव कार्यरत होते. त्यांच्या जागमी कुंदन यांची बदली करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(गृह) पदावर सैनिक यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते. आता सैनिक यांच्याकडे या पदी काम करतील. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची म्हाडामध्ये बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जयस्वाल हे काम करतील. अनिल डिग्गीकर हे या पदावर कार्यरत होते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

एमएमआरडीएचे महागगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून बदली करण्यात आली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे. एम. एस. खाडी गाव औद्योगिक बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे. एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त विकास आयुक्त (औद्योगिक) डॉ. माणिक गुरसल यांची महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. एसबीएम(ग्रामीण) पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव व प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांची रेशीम संचालक(नागपूर) म्हणून बदली करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:

शरद पवारच पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तीन खासदारांसह 9 आमदार निलंबित

शिवसेना- राष्ट्रवादीनंतर आता भाजपात होणार बंड; पंकजा मुंडे कॉंग्रेसवासी होणार

आपले विमान हवेतच जास्त असायचे; रोहित पवार यांची प्रफुल पटेलांवर जळजळीत टीका

मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची नवी मुंबई सिडकोचे सहमहाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशु खाद्य विभागाचे आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशिष शर्मा यांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

15 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

34 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

38 mins ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

3 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

3 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

3 hours ago