महाराष्ट्र

धक्कादायक! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिलेवर केला अतिप्रसंगाचा प्रयत्न

 

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांवरील लैंगिक छळाची प्रकरणात वाढत होत आहे. (Doctor Molested a Lady Patient in Covid Center) बुधवारी महाराष्ट्रातील जळगाव येथील (Jalgaon Nude Dance) महिलांच्या नग्न नृत्य घटनेने विधानसभेत (Maharashtra Assembly) गोंधळ उडाला. त्याचबरोबर आज राज्यातील औरंगाबाद शहरातूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉक्टरांनी केला लैंगिक छळ

सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना २ दिवसांपूर्वी घडली आहे. जेव्हा रात्रीच्या ड्युटीवर (Night Duty) असलेल्या डॉक्टरांनी रुग्णालयात राऊंडअप दरम्यान महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या या कृत्यावर महिलेने गोंधळ घालून विरोध दर्शविला. हे प्रकरण प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परंतु, अद्याप डॉक्टरवर कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

औरंगाबादच्या ‘या’ भागांमध्ये लागणार लॉकडाऊन

औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन (Lockdwon) लागू केले जाईल, असे संकेत स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधव मंडी अशा भागात लोकांची सर्वाधिक गर्दी असते. कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सामान्य निर्बंध इतरत्र लागू राहतील.

२४ तासांत औरंगाबादमध्ये ३७१ नवे कोरोना रुग्ण 

औरंगाबाद शहरात गेल्या २४ तासात कोरोनाचे ३७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ हजार २८७ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४७ हजार ५६४ रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १२७८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

14 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

14 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

15 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

16 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

17 hours ago