महाराष्ट्र

धक्कादायक! मुंबईत २ ते ३ दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार केला आहे. अशास्थितीत मुंबईकरांची चिंता अजून वाढवणारी बातमी आहे. मुंबईत पुढील २ ते ३ दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पुढील साठा येईपर्यंत मुंबईत कोरोना लसीचे फक्त १ लाख ८५ हजार डोस शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची अडचण

राज्य सरकारकडून लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे वारंवार विनंती केली जात आहे. पण केंद्राकडून लस पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुंबईत कोरोना लसीचे फक्त १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. त्यात कोविशिल्डचे १ लाख ७६ हजार ५४०, तर कोवॅक्सिनचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची ही अडचण होण्याची शक्यता आहे.

कोरोना लसीचा पुढील साठा १५ एप्रिलला

मुंबईत प्रत्यक्षात लसीच्या ८ ते १० लाख डोसची गरज आहे. त्यापैकी ५ ते ६ लाख डोसचा रिझर्व्ह साठा हवा. ५ लाखापेक्षा कमी साठा झाल्यास त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असतो. आता कोरोना लसीचा पुढचा साठा १५ एप्रिल रोजी येणार आहे. तो साठा ही अपुराच पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या १०८ लसीकरण केंद्र आहेत. तर दिवसाला सरासरी ५० हजार नागरिकांना लस दिली जाते.

महापौरांचा केंद्रावर निशाणा

“येत्या २ ते ३ दिवसांत मुंबईतील कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा भासणार आहे. पुढच्या लसीचा साठा १५ एप्रिलनंतर येणार आहे. मग तोवर आम्ही काय करायचे? महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असे केंद्राचे सुरु आहे. आम्हाला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे तर मग लसींचा साठा तरी हवा. राज्य सरकारने केंद्राला पत्र ही पाठवले आहे. तरी ही आम्हाला लस मिळत नाही”, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे.

मुंबईत दिवसभरात १० हजारापेक्षा अधिक रुग्ण

गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल १० हजार ३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर ७ हजार १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ७७ हजार ४९५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये २० पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७९ टक्के झाला आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

3 mins ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 hour ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

1 hour ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

2 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

4 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

22 hours ago