महाराष्ट्र

Social work : पती पोलीस उपायुक्त, पत्नी महापालिका उपायुक्त, दोघेही आपल्या गावाला ‘कोरोना’पासून वाचविण्यासाठी घेताहेत कष्ट

संजय बारहाते : टीम लय भारी

शिरूर : गावाबाहेर राहून राज्याची सेवा करत असताना, आपल्या गावातील नागरिक सुद्धा सुरक्षित राहावेत. या भावनेतून गावातील प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गणेगाव (खालसा) या गावचे सुपुत्र व नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे (Amol Tambe) व त्यांच्या पत्नी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे (Archana Tambe) या प्रयत्न करत आहेत. गावातील प्रत्येकासाठी त्यांनी होमिओपॅथी औषध पाठवले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून, त्यावर निर्बंध घालण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. ‘अयुष’ मंत्रालय – भारत सरकार यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी होमिओपॅथीचे ‘Arsenic Album 30’ हे औषध रोगप्रतिबंधक उपचार म्हणून घेण्यासाठी सुचविले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोविड- 19 या आजाराची लागण होण्याची शक्यता कमी असते. एक वर्षाच्या वयापुढील सर्वजण हे औषध घेऊ शकतात.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये तांबे दांपत्याने अहोरात्र काम केले व करत आहेत. त्यांच्या कामाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, ट्विटरवरून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गावातील गरीब नागरिकांना किमान दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्याचे वाटप अमोल तांबे यांचे वडील श्रीधर व बंधू महेश तांबे यांनी केले आहे. शिवाय, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम बांधवांना सुका मेवा भेट म्हणन दिले आहे.

गणेगाव ( ता शिरूर ) ची लोकसंख्या अडीच हजार एवढी आहे. गावातील प्रत्येकासाठी होमिओपॅथीचे औषध अमोल व अर्चना तांबे यांनी नाशिक येथून पाठवून दिले आहे. यासाठी नाशिकचे डॉ. अशर शेख यांनी मदत केली. गावचे सरपंच दत्ता पिंगळे यांच्या ताब्यात औषध देण्यात आले. ग्रामपंचातीच्या वतीने नागरिकांना औषध दिले जात आहे. शिवाय, गावातील युवकांचा एक गट तयार करून प्रत्येकाच्या घरी जाऊन औषध दिले जात आहे. राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांना औषधे दिली जातात. पण, एखाद्या गावामधील शंभर टक्के नागरिकांना औषध दिल्याची ही पहिलीच घटना आहे.

अमोल तांबे म्हणाले, ‘गावापासून दूर असलो तरी गावची नाळ कधी तुटत नसते. गावातील नागरिक आपल्यावर प्रेम करत असतात. त्या प्रेमापोटीच त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. गावातील प्रत्येकासाठी औषध पाठविले असून, ते पाच महिने पुरणार आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून गावातील नागरिक कोरोनापासून नक्कीच दूर राहतील. प्रत्येकानेच आपल्या गावासाठी थोडे-फार प्रयत्न केले तरी आपण कोरोनाला नक्कीच परतवू शकतो.’

दरम्यान, प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर असलेले तांबे दांपत्य एक वर्षापासून गावात येऊ शकले नाही. पण, गावाबाहेर राहून सुद्धा गावातील प्रत्येकाची ते आपुलकीने काळजी घेताना दिसतात. गावाला त्यांचा अभिमान असून, त्यांचे कौतुक केले जात आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago