महाराष्ट्र

समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे : शिवसेना

टीम लय भारी

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक बलात्कार हत्या प्रकरणी शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे,” अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली असून समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱया ए अबले, आम्हाला माफ कर असं सामनाच्या संपादकीयमधून  म्हटलं आहे

महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? असा सवाल भाजपला केला आहे.

“मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे,” अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

“मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांनाही सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“योगींच्या राज्यात पोलिसांचे ‘ऍण्टी-रोमिओ’ पथक तयार केले आहे. बागेत प्रेम करणाऱया तरुण-तरुणींना पोलीस लखनौ, कानपुरात मारतात, पण मुलींचे बलात्कार करून खून करण्याची पूर्ण मुभा आहे. मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजप प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या, पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे सर्व लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहेत. हे संतापजनक आहे,” असंही शिवसेनेने सांगितलं आहे.

राजीक खान

Recent Posts

नेहरू-आंबेडकरांचे संबंध परस्पर आदराचे अन् तणावाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात दोन पातळ्यांवर लढा देत होते(The Nehru-Ambedkar relationship was one of…

44 mins ago

Teacher’s Election | ज. मो. अभ्याकरांंनी शिक्षकांचं वाटोळं केलं, शिवसेनेचा चुकीचा उमेदवार

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली आहे असे असले तरीही शिक्षक व पदवीधर निवडणूकांची धामधुम…

2 hours ago

मनुस्मृती वाईट, पण त्यातील श्लोक चांगले | शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांच अजब तर्कट

सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर इयत्ता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

22 hours ago

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत…

22 hours ago

अजित पवार म्हणाले, सुनील टिंगरे यांचीही चौकशी होणार, कारवाई सुद्धा करू

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago

शरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago