मुंबईत राज्य बियाणे उपसमिती बैठक : २६ अन्नधान्य व फळपिकांच्या प्रस्तावांची केंद्राकडे शिफारस

महाराष्ट्र शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक आज मंत्रालयात कृषी विभागाचे अप्पर प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्ही.सी) पार पडली. यावेळी राज्यातील विविध कृषी विद्यापीठाच्या २६ अन्नधान्य व फळपिकांच्या वाणांची केंद्र सरकारच्या केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली, अशी माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यावेळी बैठकीत खंडू बोडके पाटील यांनी मांडल्या.महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांच्या संशोधक संचालकांनी प्रस्तावित केलेल्या २६ अन्नधान्ये, फळे व भाजीपाला पिकांच्या वानांबाबत बियाणे समितीच्या आजच्या बैठकीत चर्चा करून केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली.

 

मागील बैठकीतील १२ वानांना केंद्रिय बियाणे समितीने अधीसूचित करून मान्यता दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मागील बैठकीतील दोन फळपिकांचे प्रस्ताव केंद्रीय बियाणे समितीने नामंजूर केल्याचे विकास पाटील यांनी यावेळी सांगितले. आज बियाणे उपसमितीच्या झालेल्या बैठकीमध्ये राहुरी कृषी विद्यापीठाच्या भात (फुले कोलम), भात (फुले सुपर पवना-१३-१-२१९), उडीद (फुले राजन), मूग (फुले सुवर्ण), ऊस (फुले-१५०१२), ज्वारी (फुले पूर्वा-२३७१), मका (फुले उमेद व फुले चॅम्पियन), दापोली कृषी विद्यापीठाच्या भात (कोकण-संजय व कोकण-खारा), भगर (कोकण-सात्विक), मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ज्वारी (परभणी शक्ती – पीव्हीके १००९), कापूस (एनएच ६७७), सोयाबीन (एमएयूएस-७३१), हरभरा (परभणी चना-१६ बिडीएनजी २०१८-१६), तीळ (टीएलटी १०), अकोला कृषी विद्यापीठाचे मका हायब्रीड (पीडीकेव्ही आरंभ-१८-२), राळ (पिडीकेव्ही यशश्री – ८२), सूर्यफुल (सूरज पिडीकेव्ही-९६४) या अन्नधान्य पिकांच्या प्रस्तावासह फलोत्पादन विभागाच्या राजमा (फुले विराज), कवठ (प्रताप-१), लसूण (पूर्णा एकेजी-७), मिरची (पीबीएनएस-१७), टोमॅटो (पीबीएनटी-२०), वाली (कोकण शारदा- डीपीएल-९), केगाव संशोधन केंद्राचे डाळिंब सोलापूर अनार दाणा या फळे व भाजीपाला पिकांच्या प्रस्तावांना मान्यता देवून केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली.
बैठकीस शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ डी.बी लाड, भाततज्ञ डॉ बी.डी.वाघमोडे, विकास पाटील, डॉ. समरसिंग राजपुत, डॉ.बी.डी वाघ, कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी दीपक पाटील, डॉ.पी.के गुप्ता, डॉ.सी.एन. जावळे, डॉ.टी.डी.देशमुख, डॉ.सौ.आम्रपाली अखारे, कर्जतचे जे पी देवमोरे, कैलास भोईटे, डॉ.एल.एन जावळे, डॉ. किरन मालशे, डॉ. एम.पी देशमुख, के एस बेग, डॉ. एन.व्ही काशीद, शाम जाधव, राहुरीचे डॉ. सुनील कराड, के. धिनेश बाबू, शरद गडाख, धनंजय कोंधालकर यांच्यासह सर्व कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या व्यथा आज राज्य बियाणे उपसमितीच्या बैठकीत येनवेळी येणाऱ्या विषयात मांडून केंद्र सरकारकडे तत्काळ कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी आपण केली आहे. तसेच नाशिक जिल्हा बँकेने अल्पभूधारक थकबाकीदार शेतकऱ्यांवर सुरू केलेली जप्तीची कारवाई स्थगित करावी तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस कृषी कंपन्या व पीकविमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही आपण या बैठकीत कृषी विभागाचे अप्पर प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली आहे. त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago