महाराष्ट्र

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यातील २१ खासदारांचा पाठिंबा, खासदार संभाजीराजे छत्रपतींकडे पत्रे सुपूर्द

टीम लय भारी

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण (Maratha reservation) टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत २१ खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी निवेदन देणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भेटीची मागणी केली आहे.

मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्याविषयी मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू आहेत. काही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही ढोल बजाओ आंदोलने केली जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही आहे.

मराठा आरक्षणासाठी या खासदारांचा पाठिंबा

सुभाष भामरे, धुळे (माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री), राजन विचारे (ठाणे), प्रतापराव पाटील-चिखलीकर (नांदेड), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), संजय पाटील (सांगली), श्रीरंग बारणे (मावळ), हेमंत गोडसे (नाशिक), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), धैर्यशील माने (हातकणंगले), नवनीत कौर राणा (अमरावती), राहूल शेवाळे (दादर), प्रतापराव जाधव (बुलढाणा), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), डॉ. भारती पवार (दिंडोरी), हिना गावित (नंदुरबार), रक्षा खडसे (रावेर), डॉ. प्रितम मुंडे (बीड), डॉ. सुजय विखे पाटील (नगर), उन्मेष पाटील (जळगाव).

अभिषेक सावंत

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 hour ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

3 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

1 day ago