महाराष्ट्र

निराधार झालेल्या महिलांना ‘आधार’; रोहित पवार देणार रोजगार

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाच्या माहामारीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही कुटुंबातील लोकांनी घरातील कर्त्या पुरूषाला गमावले आहे. अशा निराधार झालेल्या महिलांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) धावून आले आहेत. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे या महिलांच्या (Women) रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना (Women) स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक महिला (Women) तसेच घरातील वयोवृध्द व्यक्ती निराधार झाले आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या निराधार महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याकरिता रोहित पवार (Rohit Pawar) हे त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

नितीन गडकरी खूपच चांगला माणूस, पण… अशोक चव्हाणांची खंत…

आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार हात झटकत आहे, शिवसेनेचा केंद्र सरकारला सणसणीत टोला

Is CoWin data safe? And other questions answered by the CEO of the agency that runs the vaccine app

महिलांना (Women) शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला (Women) स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पवार हे स्वयं रोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.

निराधारा महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न

घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने अशा कुटुंबावर आलेले संकटे मी समजू शकतो. याच जाणिवेतून कुटुंबातील निराधार महिलांच्या (Women) हाताला काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरिता ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार सहाय्य करण्यात येणार आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले.

म्युकर मायकोसिसबाबत समुपदेशन

तसेच कर्जत-जामखेडमधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ‘काळी बुरशी’ म्युकर मायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे 6 जून रोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago