Supriya Sule : सुप्रिया सुळेंची माणूसकी, लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या माय लेकराची घालून दिली भेट

टीम लय भारी

पुणे : एक वर्षाच्या बाळाला दोन – तीन दिवसांसाठी त्याच्या आजीच्या घरी ठेवले. पण अचानक लॉकडाऊन झाला अन् महिन्यानंतरही बाळाची आईशी भेट होणे दुरापास्त झाले. त्यामुळे आईचाही जीव कासावीस झाला. या नाजूक प्रसंगात खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी मदतीचा हात पुढे केला, अन् बाळाची आईसोबत भेट झाली.

संगणक अभियंते असलेले सचिन व पुनम फुसे हे दांपत्य पुण्यातील मगरपट्टा परिसरात राहतात. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. 20 मार्च रोजी पुनम यांनी बाळाला मावळ येथील त्याच्या आजीकडे ( म्हणजे पुनम यांच्याकडे आईकडे ) ठेवले होते. त्यानंतर दोनच दिवसांत लॉकडाऊन लागू झाला.

लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपल्यानंतर मुलाला घेऊन यायचे असे पुनम यांनी ठरविले होते. परंतु 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढला. बाळाला आईशिवाय राहायची सवय नव्हती. त्यामुळे ते आजीकडे अधूनमधून रडायला लागले. त्याची तब्येतही खालावली. बाळाचे आजी – आजोबांचा जीव कासावीस झाला, तर इकडे बाळाच्या आईलाही राहवेना.

या नाजुक परिस्थितीत पुनम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्याशी संपर्क साधला. भिलारे यांनी पुनम यांचा खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यासोबत संपर्क करून दिला.

पुनम यांची बाळाशी भेट घडवून आणणे तसे कठीणच होते. कारण बाळाला घेऊन येण्यासाठी शहरांच्या हद्दी ओलांडाव्या लागणार होत्या. शहरांच्या हद्दी सील केल्यामुळे ही भेट कशी घडवून आणायची हा पेच सुप्रियाताईंसमोर ( Supriya Sule ) सुद्धा होता.

मानवतेच्या दृष्टीने पुनम यांना मदत करणे गरजेचे होते. त्यामुळे सुप्रियाताईंनी ( Supriya Sule ) गृह खात्यातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून पुनम यांना डिजिटल प्रवास पास देण्यास सांगितले.

सुप्रिया सुळेंच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या आदिती नलावडे यांनी गृह खात्याचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुनम यांना डिजिटल पास मिळाला.

पास मिळाल्यानंतर पुनम यांनी मावळला प्रवास करून बाळाला ताब्यात घेतले. एक महिन्याच्या विलंबानंतर 21 एप्रिल रोजी बाळाची भेट झाली. योगायोगाने त्याच दिवशी बाळाचाही वाढदिवस होता. माय – लेकरांची भेट झाल्यानंतर कुटुंबातील सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. सायंकाळी पुनम त्यांच्या बाळासह पुण्याला परतल्या.

‘कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. पण सामान्य लोकांच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून बाळाची आईसोबत भेट होणे आवश्यक होते. म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली. पोलिसांनीही त्वरीत पास देण्याची तजवीज केली’ – खासदार सुप्रिया सुळे

‘सुप्रियाताईंनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही. आम्हाला गरज होती तेव्हा ताई ( Supriya Sule ) देवासारख्या धावून आल्या. त्यांच्या मदतीमुळेच बाळाशी भेट होऊ शकली’ अशा भावना पुनम यांनी व्यक्त केल्या.

माय – लेकराची भेट घडवून आणण्यासाठी बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजय खोत, मनीष बोरकर, पुण्यातील युवती काँग्रेसच्या पदाधिकारी स्नेहल शिनगारे यांनी समन्वय साधला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

Covid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण तो महाराष्ट्रासाठीच वापरणार का ?

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

महाराष्ट्रात कोणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही : सुप्रिया सुळे

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago