महाराष्ट्र

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८६ हजाराच्या घरात!

टीम लय भारी

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाचे सर्वाधिक ३००७ नव्या रुग्णांची भर पडली असून ९१ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा ८५ हजार ९७५ वर पोहचला असून आतापर्यंत एकूण ३०६० जणांचा बळी गेला आहे.

राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये ( ७३.६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर -५, मीरा भाईंदर – ४,सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१, असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय अॅक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (४८,७७४), बरे झालेले रुग्ण- (२१,१९०), मृत्यू- (१६३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), अॅक्टीव्ह रुग्ण- (२५,९४०)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१३,०१४), बरे झालेले रुग्ण- (४८३६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (७८४६)

पालघर: बाधीत रुग्ण- (१४८५), बरे झालेले रुग्ण- (६०७), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८३८)

रायगड: बाधीत रुग्ण- (१४४१), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), अॅक्टीव्ह रुग्ण- (६४९)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१५२१), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४०५)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९४)

धुळे: बाधीत रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१००)

जळगाव: बाधीत रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४८९)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधीत रुग्ण- (९७०५), बरे झालेले रुग्ण- (५५१६), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३७८३)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (१३४३), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६१९)

सातारा: बाधीत रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (२९४)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३०४)

सांगली: बाधीत रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५८)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९५)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३५४), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१८५)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१९६५), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६८४)

जालना: बाधीत रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६४)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५०)

परभणी: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधीत रुग्ण- (१३७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३१)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६२)

बीड: बाधीत रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),अॅक्टीव्ह रुग्ण- (१५)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५४)

अकोला: बाधीत रुग्ण- (७७८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (३०२)

अमरावती: बाधीत रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१०८)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४३)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३६)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधीत रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३०२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधीत रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१५)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१०)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (७)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१५)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५३)

एकूण: बाधीत रुग्ण-(८५,९७५), बरे झालेले रुग्ण- (३९,३१४), मृत्यू- (३०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), अॅक्टीव्ह रुग्ण-(४३,५९१)

अभिषेक सावंत

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

9 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

11 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

12 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago